हिंदूंनो, यांना तुम्ही क्षमा करणार का ?

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच एका वाहिनीला सांगितले, ‘त्या वेळी त्यांनी जो ‘भगवा आतंकवाद’ अथवा ‘हिंदु आतंकवाद’, हा शब्द वापरला तो चुकीचा होता आणि तो शब्द वापरण्यास काँग्रेस पक्षाकडून त्यांना सांगण्यात आले होते.

पत्रकार शुभांकर मिश्रा (उजवीकडे) यांच्या पॉडकास्ट दारम्याने या विषयावर बोलतांना सुशीलकुमार शिंदे

कथित आरोपामुळे हिंदूंची झालेली हानी

हिंदूंनो, ‘भगवा आतंकवाद’ अथवा ‘हिंदु आतंकवाद’, हे शब्द उच्चारून केवळ काँग्रेसी शांत बसले नाहीत, तर त्यांनी अनेक बाँबस्फोटाच्या प्रकरणांमध्ये निरपराध हिंदूंना आरोपी म्हणून अटक केली. यामुळे…

अ. अनेक हिंदु युवकांना ऐन उमेदीच्या वर्षात कारावासात खितपत पडावे लागले…

आ. या निर्दाेष हिंदूंच्या कुटुंबियांना अनेक वर्षे प्रशासन, जनता, माध्यमे यांचा अनावश्यक जाच सहन करावा लागला…

इ. दिलीप पाटीदारसारखे काही हिंदू तर या प्रकरणांच्या काळात गायब केले गेले, ते आजपावेतो सापडलेले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकतेचा आपण विचारच करू शकत नाही…

ई. दिलीप साहू यांच्याप्रमाणे या प्रकरणांत विनाकारण अडकवलेल्या हिंदूंच्या काही नातेवाइकांना त्रास सहन न झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात हानी सहन करावी लागली की, जी कधीच भरून न काढता येण्यासारखी आहे…

उ. अनेक हिंदु युवकांचे शिक्षण अर्धवट राहिले, चांगल्या नोकर्‍या सुटल्या, ही हानी कोण भरून देणार आहे ?…

ए. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची (अर्थ : संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.), तसेच विश्वशांतीची शिकवण देणार्‍या हिंदु धर्मातील हिंदूंना ‘हिंदु आतंकवादी’ दाखवून जगभरात अपकीर्त केले गेले…

याप्रमाणे कधीही न भरून निघेल, अशी हिंदु धर्म आणि धर्मीय यांची हानी केलेल्या सुशीलकुमार शिंदे अन् काँग्रेसी यांना क्षमा करणार का ?

– एक धर्मप्रेमी