आदर्श प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था !

१. गुन्हेगाराला गुन्हा करण्यास थांबवणारे तत्त्व

‘आत्मा, शरीर, इंद्रिये, अर्थ, बुद्धी, ज्ञान, सिद्धी, मन, वृत्ती, दोष, भूत, परिणाम आणि न्यायसूत्र यांविषयी लिहिणारे गौतम ऋषी म्हणाले की, ‘दुःख जन्मप्रवृत्तिदोष मिथ्याज्ञान मुत्तरोत्रापे तदन्तर पयदापा वर्गः।’ (संदर्भ : न्यायशास्त्र) याचा अर्थ ‘दु:ख, जन्मतः प्राप्त झालेली सदोष प्रवृत्ती, खोटे ज्ञान आणि खोट्या ज्ञानातून निर्माण होणारे दुष्कृत्य हे सर्व नंतर मोक्ष, तसेच न्यायशास्त्र यांनी दूर होऊन जाते.’ न्यायशास्त्रानुसार ज्या तत्त्वांचे ज्ञान हे मोक्ष किंवा गुन्हा अथवा अवैध कृती यांना थांबवते, त्यांची संख्या ‘पुरावा (हे मुख्य ४ आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, सदृश्य आणि शब्द) आणि प्रमेय (हे १२ आहेत. ते आत्मा, शरीर, इंद्रिये, अर्थ, बुद्धी, ज्ञान, सिद्धी, मन, वृत्ती, दोष, प्रेतभाव, फळ (परिणाम))’, यांप्रमाणे आहे.

२. सध्याच्या न्यायव्यवस्थेतील प्रचलित दोष दूर करण्यासाठी प्राचीन भारतीय न्यायशास्त्र आणि न्यायव्यवस्था यांचे ज्ञान आवश्यक !

सध्याच्या न्यायव्यवस्थेतील प्रचलित दोष दूर करण्यासाठी आपल्याला प्राचीन भारतीय न्यायशास्त्र आणि न्यायव्यवस्था यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान आपल्याला वैदिक साहित्य, वेदांग, सूत्र ग्रंथ, स्मृती ग्रंथ, रामायण, महाभारत, पुराणे, अर्थशास्त्र आणि इतर धर्मशास्त्रीय ग्रंथ, संस्कृत काव्य इत्यादींचा अभ्यास करूनच साध्य होऊ शकेल.

‘अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणे’, हे प्राचीन भारतीय तत्त्ववेत्त्यांचे ध्येय होते. गुन्हा घडणे, हाच अधर्म आहे. त्यामुळे न्यायाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अस्तित्व नष्ट करून धर्माची स्थापना केली पाहिजे. त्यामुळे प्राचीन ऋषींनी ‘न्यायाची स्थापना हाच धर्म मानला.’ अर्थात् गुन्ह्याचे मूळ कारण षड्रिपू (काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर) आहेत. या ६ शत्रूंवर विजय मिळवून पाप आणि अधर्म नष्ट होऊन धर्माची स्थापना होईल अन् त्यातून न्यायाची योग्य व्यवस्था निर्माण होईल.

श्री. रमेश शिंदे

३. मनुष्याला गुन्हा करण्यास भाग पाडणारे षड्रिपू

तात्त्विक परिभाषेत वासना, म्हणजे मनात अयोग्य इच्छा असणे. हीच अवास्तव इच्छा मनुष्याला वाईट कृत्ये करण्यास प्रवृत्त करते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती विविध प्रकारची पापे करते. अधर्माचा नाश करून धार्मिकता प्रस्थापित करणे, हे प्राचीन भारतीय तत्त्ववेत्त्यांचे ध्येय होते. गुन्हा करणे, हाच अधर्म आहे. त्यामुळे न्यायाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अस्तित्व नष्ट करून धर्माची स्थापना केली पाहिजे. त्यामुळे प्राचीन ऋषींनी न्यायाची स्थापना करणे, हाच धर्म मानला होता. त्यामुळे गुन्ह्याचे मूळ कारण षड्रिपू आहे. केवळ या ६ शत्रूंवर विजय मिळवून पाप आणि अधर्म यांचा नाश होऊ शकतो.

कामशास्त्राचे लेखक ऋषि वात्स्यायन म्हणाले की, भौतिक सुख मिळवण्यासाठी केलेली कृती हे पापांचे (गुन्ह्यांचे) मूळ आहे. या इच्छा पूर्ण करण्याचा विचार आणि प्रयत्न व्यक्तीमध्ये परस्पर द्वेष अन् परस्पर संघर्ष निर्माण करतात. त्यामुळे त्याच्याकडून गुन्हा घडतो. माणसाच्या या इच्छा (वासना) क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या भावनांना जन्म देतात. हे षड्रिपू मानवाला पाप (गुन्हे) करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे ते मनुष्याचे नैसर्गिक शत्रू (रिपू) आहेत. प्राचीन लोकांच्या मते या ६ शत्रूंवर विजय मिळवून धर्माची स्थापना करावी. याद्वारे अहिंसा, सत्य, अस्तित्व, शौच आणि इंद्रिय यांवर नियंत्रण प्राप्त होते. थोडक्यात हा धर्म आहे आणि दुसर्‍या शब्दांत हाच न्याय आहे.

४. अहिंसा, सत्य, चोरी, पावित्र्य आणि इंद्रिय यांचा संयम

प्राचीन काळी प्रशासन व्यवस्थेच्या विकासासमवेतच कायदा आणि न्यायव्यवस्था यांचाही विकास झाला. वैदिक संहितांमध्ये वरुण आणि सोम यांना शासन, कायदा अन् न्याय यांचे प्रमुख देवता म्हटले गेले आहे. सार्वजनिक व्यवहारात राजा हा वरुणचा प्रतिनिधी समजला जात असे. ‘सरकारचे नियम आणि नियमांचे योग्य पालन केले जाईल अन् लोकांना जलद आणि खरा न्याय मिळेल’, हे राजाचे कर्तव्य आहे. कठोर शिक्षेच्या भीतीमुळे सामान्य लोक गुन्ह्यांपासून लांब रहातात. तथापि साधा, स्वस्त आणि जलद न्याय त्वरित उपलब्ध होत होता.

५. प्राचीन धर्मग्रंथात सांगितलेल्या ८ प्रकारच्या शिक्षापद्धत

वाग्दंड (रागावणे), धिग्दंड (धिक्कार करणे), अर्थदंड, उद्वेजन (क्लेश देणे), अंग विच्छेदन (शरिराचा अवयव तोडणे), निर्वासन (वध), कारावास आणि मृत्यूदंड या ८ शिक्षा प्राचीन ग्रंथात दिलेल्या आहेत. इंग्लंड, पश्चिम युरोप आणि संयुक्त राज्य यांमध्ये न्यायाधीश अन् अधिवक्ते २० व्या शतकांपासून भारतीय संस्कृतीच्या न्यायशास्त्रातून प्रेरणा अन् शिक्षण घेत आहेत. याउलट भारतीय न्यायाधीश किंवा अधिवक्ते कुठून प्रेरणा घेतात ? ते भारतीय संस्कृतीच्या न्यायशास्त्राकडून शिकत नाहीत. त्यांना रोमन कायदे आणि पाश्चात्त्य न्यायतज्ञ यांच्या सिद्धांताविषयी ठाऊक आहे; परंतु भारतीय संस्कृतीतील कायदे आणि न्यायशास्त्र यांचा विकास यांविषयी विशेष माहिती नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शांतीस्वरूप धवन म्हणाले, ‘‘ज्ञानी न्यायाधीश गंगेप्रमाणे स्वर्गातून उतरत नाहीत, तर ते समाजातूनच उदयास येतात आणि सामाजिक वातावरणाने ते परिपक्व असतात. महान न्यायाधीश जन्मजात नसतात, तर योग्य शिक्षण आणि महान कायदेशीर परंपरा यांनी ते निर्माण होतात, जसे प्राचीन भारतात मनु, कौटिल्य, कात्यायन, बृहस्पती, नारद, पराशर आणि याज्ञवल्क्य इत्यादी कायद्याचे दिग्गज होते.’’

६. ब्रिटीश लेखकांकडून प्राचीन भारतीय न्यायप्रणालीचे चुकीचे चित्रण

काही ब्रिटीश लेखकांनी भारतीय न्यायशास्त्र आणि प्राचीन भारतातील न्यायव्यवस्था यांविषयी केलेले घोर चुकीचे विधान वाचकांनी नाकारले पाहिजे. मी काही उदाहरणे देईन. हेनरी मेन याने प्राचीन भारतातील न्यायप्रणालीचे क्रूर मूर्खपणाचे साधन म्हणून चित्रण केले आहे. एका ॲग्लो इंडियन विधीज्ञाने इंग्रजांचे भारतात आगमन होण्यापूर्वी भारतियांच्या जीवनातील प्राचीन  सवयींविषयी टिप्पणी केली, ‘हे (भारतातील ब्रिटीश राजवट) विदेशी राज्यकर्त्यांनी एका अज्ञात भूमीवरील अनोळखी वंशांवर राज्य करण्यासाठी युरोपीय व्यवस्थांना जीवनाच्या प्राचीन सवयींना अनुकूल बनवण्यासाठी आणि त्या लोकांमध्ये, जे नेहमी शासनाला मनमानी अन् अनियंत्रित अधिकाराशी संबंधित असतात, ठरलेल्या कायद्यांना सर्वाेच्च बनवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगांची नोंद आहे.’ भारतीय नागरी सेवेचे निवृत्त सदस्य ॲलन ग्लेडहिल यांनी लिहिले आहे, ‘जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सत्ता घेतली, तेव्हा कायदेशीर तत्त्वांचा अभाव होता.’

७. स्वतंत्र आणि परिपूर्ण प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था

प्राचीन भारतातील न्यायव्यवस्थेचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी आपण मूळ ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्याकडून वाचकाला कळेल की, भारतीय न्यायशास्त्र कायद्याच्या नियमावर आधारित होते. राजा हाही कायद्याच्या अधीन होता. भारतीय राजकीय सिद्धांत आणि न्यायशास्त्र यांत मनमानी करण्यास जागा नव्हती. राजाचा शासनाधिकार कर्तव्यपालनाच्या अधीन होता. त्याचे उल्लंघन केल्यामुळे सिंहासन संपुष्टात येत होते. न्यायाधीश स्वतंत्र होते आणि केवळ कायद्याच्या अधीन होते. कोणत्याही प्राचीन देशाच्या तुलनेत प्राचीन भारतात न्यायपालिकेची क्षमता, ज्ञान, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्य यांचे मानक अत्युच्च होते अन् आजही त्यांना ओलांडता आले नाही.

भारतीय न्यायव्यवस्थेत मुख्य न्यायमूर्तींच्या न्यायालयासमवेत न्यायमूर्तींचा एक असा पदानुक्रम होता, ज्यात प्रत्येक उच्च न्यायालयाला खालच्या न्यायालयाच्या निवाड्याची समिक्षा करण्याचा अधिकार होता की, त्यांच्याकडे आलेले वाद मूलत: नैसर्गिक न्यायाच्या त्याच तत्त्वांनुसार ठरवले जात होते, जे सध्या आधुनिक राज्यव्यवस्थेत न्यायिक प्रक्रिया नियंत्रित करतात. प्रक्रिया आणि साक्ष यांचे नियम आजच्या सारखेच होते.

पुराव्यासाठी कठोर परीक्षेच्या निसर्गाविरुद्ध पद्धतींना निरुत्साहित करण्यात येत होते. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपीचा गुन्हा कायद्यानुसार सिद्ध होत होता. प्राचीन भारतात कायद्याचे राज्य होते का ?, हे आपण थेट ग्रंथांमधूनच जाणून घ्यायला हवे. महाभारतात म्हटले आहे, ‘प्रजेचे रक्षण करण्याची शपथ घेऊनही तिचे रक्षण न करणारा राजा वेड्या कुत्र्याप्रमाणे मारण्यास पात्र आहे. असा राजा जो म्हणतो की, तुमचे रक्षण करील; पण तो तुमचे रक्षण करत नाही, त्याला वेडेपणाने ग्रासलेल्या कुत्र्याप्रमाणे गोळ्या घालून मारले पाहिजे. जो राजा त्याच्या प्रजेचे रक्षण करत नाही; परंतु त्यांची संपत्ती हिरावून घेतो आणि कुणाचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेत नाही, तो मारला जाण्यास पात्र आहे. असा राजा हा राजा नाही. त्यानंतरच धर्म स्थापन होईल आणि यातून न्यायाची योग्य व्यवस्था निर्माण होईल !’

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

संपादकीय भूमिका

न्यायाच्या माध्यमातून (धर्माच्या माध्यमातून) गुन्ह्यांचे (अधर्माचे) अस्तित्व नष्ट करून धर्माची, म्हणजेच न्यायाची स्थापना केली पाहिजे !