छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे यथार्थ वर्णन

‘लाभदायक नसल्यास लढाई टाळावी; परंतु केव्हाही रणामध्ये भित्रेपणाने वा बेशिस्तीने अपकीर्ती (बदलौकिक) करून घेऊ नये. शौर्याने अशी झुंज देत रहावी की, त्यात अपयश आले, तरी जगात सत्कीर्ती वाढली पाहिजे, म्हणजे शत्रूला धाक बसतो. स्वसैन्यात अनीती वाढत नाही, शिस्त सुटत नाही, उत्साह वाढू लागतो, शौर्याचा उत्कर्ष होतो, तेव्हा विजय हटकून मिळतो. शत्रूने आपल्याला शौर्याने जिंकले, असे कधीही होऊ देऊ नये, ही श्रीकृष्णनीतीची (गनिमी काव्याची) किल्ली आहे.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा चांगला उपयोग केला होता.

– स्वातंत्र्यवीर सावरकर