उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शिवानी कामत ही या पिढीतील एक आहे !
‘उद्या आश्विन शुक्ल नवमी (१२.१०.२०२४) या दिवशी कु. शिवानी कामत हिचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजींच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. शिवानी गिरीश कामत हिला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. ‘कु. शिवानीला एखादी वस्तू हवी असल्यास ती ‘घेऊ का ?’, असे विचारते.
२. इतरांचा विचार करणे
माझे (श्रीमती सुधा कामत यांचे) शस्त्रकर्म झाल्यावर शिवानी माझी पुष्कळ काळजी घेत होती. मी चालत असतांना ती माझा हात धरत असे. कुणी माझ्याजवळ आल्यास ‘माझ्या पोटाला लागू नये’, याची ती काळजी घेत होती. घरातील व्यक्तींना बरे वाटत नसल्यास शिवानी त्यांना साहाय्य करते.
३. ती सर्वांशी जुळवून घेते.
४. ऐकण्याची वृत्ती
एकदा तिचे काका श्री. गणेश कामत यांनी तिला ‘‘जेवत असतांना दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहू नये’’, असे सांगितले. त्याचे ती पालन करत आहे.
५. शिकण्याची वृत्ती
तिचे काका श्री. गणेश यांनी तिला ‘आपल्यावर त्रासदायक (काळे) आवरण कसे येते ? ते दूर करण्यासाठी नामजपादी उपाय कसे करायचे ? आपण नामजप केल्यास देव आपल्या समवेत असतो’ इत्यादी माहिती सांगितली. त्याविषयी ती आणि तिची लहान बहीण सन्निधी कामत बोलतात. त्यांच्याकडून आवरण येण्यासारख्या गोष्टी (राग येणे, हट्ट करणे, गोंधळ आणि भांडणे करणे) घडल्यास त्या लगेच त्याविषयी एकमेकींना जाणीव करून देतात.
६. साधना
शिवानी बालसंस्कार वर्गात जाते. ती थोडा वेळ नामजप करते.
७. ती आम्हाला सेवेत साहाय्य करते.’
– सौ. प्रभा कामत (कु. शिवानीची आजी (वडिलांची आई), आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ६९ वर्षे) आणि श्रीमती सुधा कामत (कु. शिवानीची चुलत आजी), शिवमोग्गा, कर्नाटक. (२८.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |