नाम घेण्याचे महत्त्व !

विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही, प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते, तिथे भगवंताला यावे लागल्याने शरिरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. ‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ‘ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज