नवरात्रोत्सव विशेष
अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते ।
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।
– दुर्गासप्तश्लोकी
अर्थ : रणात मदोन्मत्त शत्रूचा वध करणारी, अविनाशी शक्ती धारण करणारी, महिषासुराचे मर्दन करणारी, केसांनी आकर्षित करणारी पर्वताची पुत्री तुझा विजय असो.
छत्रपती शिवरायांचे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी मोगलांशी झुंजण्यासाठी स्वतः युद्धाची धुरा वाहिली अन् मराठ्यांच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचे नेतृत्व, शौर्य आणि धैर्य आजही आपल्याला प्रेरणा देणारे ठरत आहे. राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी राणी ताराबाई आक्रमक झाल्या. संपूर्ण हिंदुस्थानावर ‘हुकूमत (हक्क)’ गाजवण्याचे स्वप्न पहाणार्या मोगल बादशाह औरंगजेबाला एक २५ वर्षांची रणरागिणी आव्हान देत होती ! ताराबाईंनी लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. सरसेनापती संताजी, धनाजी यांना समवेत घेऊन मोगलांना सळो कि पळो करून सोडणारी ही रणमार्तंड रागिणी, रणचंडिका महाराणी ताराबाई ! या महाराणीविना मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही.
एक युवा विधवा राणी मोगल बादशाह औरंगजेबाशी सलग ७ वर्षे संघर्ष करून त्यास चारीमुंड्या चित करते, ही गोष्ट मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत असामान्य घटना आहे. महाराष्ट्रास गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेब बादशाहास तिने महाराष्ट्राच्या मातीत गाडले. त्याच औरंगजेबाची थडगी आज पुजली जात आहेत. क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा एक प्रकारे राष्ट्रद्रोहच आहे. हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारे अनेक गड-दुर्ग आज इस्लामी अतिक्रमणांनी वेढलेले आहेत. रातोरात गड-दुर्गांवर दर्गे आणि थडगे उभे रहात आहेत. भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न धर्मांध गेल्या कित्येक शतकांपासून पहात आहेत. लव्ह जिहादची प्रकरणे देशभरात सर्वत्र गल्लोगल्ली घडत आहेत, इस्लामी आतंकवादाने देशाला पोखरले आहे. हिजबुल्लाचे समर्थक उघडपणे मोर्चे काढत आहेत. भारताचा इस्लामीस्तान होऊ द्यायचा नसेल, तर मुसलमान आक्रमकांशी लढणार्या महाराणी ताराबाईंसारख्या विरांगनांच्या शौर्याची आज आवश्यकता आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे.