नवरात्रीतील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या भावसत्संगाविषयी साधिकांना आलेल्या अनुभूती

गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशीच्या अंकात भावसत्संगाविषयीच्या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840131.html

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

६. सौ. रेखा सावरकर, कोपरखैरणे

६ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजाने वास्तूमध्ये चैतन्य जाणवून ‘मंदिराच्या गाभार्‍यात आहे’, असे वाटणे : ‘सत्संग चालू होऊन सत्संगात प्रार्थना चालू झाल्यावर ‘पूर्ण ९ दिवस मी मंदिराच्या गाभार्‍यात असून हे भावसत्संग कधीच संपू नयेत’, असे मला वाटत होते. डोळे बंद केल्यावर मला श्री भवानीमातेचे दर्शन होऊन माझ्या अंगावर रोमांच यायचे. मला ‘माझे अस्तित्व नाही’, असे वाटायचे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजाने वास्तूमध्ये चैतन्य जाणवायचे. सतत श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.’

७. श्रीमती प्रभा देसाई, मुलुंड

७ अ. भावसत्संग ऐकतांना दुःख विसरून मन आनंदी होणे : मला वाटायचे, ‘सर्व साधक देवीतत्त्व ग्रहण करतात; पण मला काहीच जाणवत नाही; पण ‘मला सत्संग तरी मिळतो, ही देवाची कृपा’ या कृतज्ञताभावाने मी भावसत्संग ऐकत होते. जोगवा चालू झाला, तेव्हा ‘मी माझ्या कुलदेवतेसमोर आहे’, असे मला जाणवले. नवमीच्या दिवशी गोंधळ ऐकतांना माझे तन आणि मन सर्व हलके होऊन मन आनंदाने नाचत होते. माझे मन हलके आणि आनंदी झाले होते. ‘मला गुरुदेवांच्या कृपेने ही अनुभूती आली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

८. सौ. प्रीती जड्यार आणि श्री. दयानंद जड्यार, रत्नागिरी 

८ अ. हा भावसत्संगरूपी उत्सव म्हणजे प.पू. गुरुदेवांनी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांना दिलेली जणू दैवीशक्ती ! : ‘नवरात्रीमधील भावसत्संग ऐकतांना ‘साक्षात् श्री दुर्गादेवी घरी आली आहे’, असे जाणवत होते. प्रतिदिन भावाच्या स्थितीत रहाता येत होते. प्रतिदिन एका देवीचे, अशी देवीची ९ रूपे अनुभवता आली. सत्संगात सात्त्विक गाणी ऐकवली जायची. त्यामुळे मन हलके होऊन प्रसन्न वाटायचे. ‘या सत्संगाने घरातील वातावरण चैतन्यमय झाले’, असे वाटत होते. ‘हा भावसत्संगरूपी उत्सव म्हणजे प.पू. गुरुदेवांनी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांना ‘दैवीशक्ती’ दिली आहे’, असे अनुभवले.’

९. सौ. ज्योती देशमुख, बोईसर  

९ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची सत्संगातील उपस्थिती अनुभवतांना भावजागृती होणे : ‘मला सर्वत्र गुरुमाऊली उपस्थित आहे’, असे जाणवायचे. मला ‘साक्षात् दुर्गास्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि लक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ भावसत्संगात उपस्थित आहेत’, असे जाणवायचे. त्यांची उपस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न केल्यावर माझा भाव जागृत व्हायचा. तेव्हा शरिराच्या काही भागात झटका बसायचा आणि शरिरात कंपने जाणवायची.’

१०. सौ. अर्चना अंधारे, बोईसर

१० अ. सत्संग ऐकतांना भाव जागृत होऊन श्री सरस्वतीदेवीला प्रार्थना केल्या जाणे : ‘श्री सरस्वतीदेवीचा सत्संग ऐकतांना पुष्कळ भावजागृती झाली. माझ्याकडून श्री सरस्वतीदेवीला ‘या वाणीतून इतरांचे मन दुखावले जाऊ नये, प्रत्येक शब्द तुला अपेक्षित असा बोलला जाऊ दे, माझा बुद्धीलय होऊ दे, तुझी कृपादृष्टी राहू दे, तुझ्याप्रती भावभक्ती वाढू दे’, अशा प्रार्थना झाल्या. मला अष्टदेवींची रूपे समजली. ‘गुरुदेव आपल्यावर लक्ष्मीची कृपा करून देत आहेत’, असे मला जाणवले.’

११. सौ. आशा दौंडकर, नेरूळ

११ अ. सर्व देवींमध्ये गुरुदेव असून सर्व देवींचे तत्त्व अंतर्मनापासून अनुभवता येणे : ‘मला नवरात्रीच्या भावसत्संगात पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी असलेल्या देवीचे तत्त्व अंतर्मनापासून अनुभवता येत होते. मी त्या देवीच्या तत्त्वापासून फार दूर गेले होते; परंतु ‘आता साक्षात् आई लक्ष्मीने मला त्याची जाणीव करून दिली’, असे वाटून पुष्कळ रडू येत होते. ‘सर्व देवींमध्ये साक्षात् गुरुदेव आहेत’, असे मला वाटत होते.’

१२. सौ. तनुजा यादव, कोपरखैरणे

१२ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजाने स्वतःला आध्यात्मिक लाभ होऊन चैतन्यही मिळणे : ‘प्रतिदिनच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना ‘तो जणूकाही देवतेचा मंजुळ आवाज आहे’, असे मला वाटायचे. त्यातून मला  आध्यात्मिक लाभ होऊन त्यांच्या आवाजातून चैतन्यही मिळत होते. ‘त्यांचा आवाज सतत ऐकत रहावा’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळत होता.’

१३. सौ. मीना महाडीक, मुलुंड

१३ अ. नवरात्रीचे भावसत्संग ऐकतांना ‘देवी समवेतच आहे’, असे वाटणे आणि आता ‘प.पू. गुरुदेव समवेत आहेत’, असे वाटणे : ‘नवरात्रीचे भावसत्संग ऐकल्यापासून माझे भावाच्या स्तरावर कृती करण्याचे प्रमाण वाढले. मला सत्संग चालू असतांना आणि दिवसभरात कधीही दुर्गादेवीचा चेहरा अंतर्मनात दिसतो. ‘देवी सर्वकाही करून घेत असून ती माझ्या समवेतच आहे’, असे मला वाटायचे. आता ‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटते.’

१४. सौ. दक्षता जाधव, मुलुंड

१४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतून देवीची शक्ती अनुभवता येणे : ‘नवरात्रीतील ९ दिवस भावसत्संग ऐकल्याने पुष्कळ शक्ती मिळाली’, असे मला जाणवत होते. या दिवसांत मला देवीचे प्रत्येक रूप अनुभवता आले. त्यामुळे देवीवरील भक्ती वाढली. ’

१५. सौ. सुलभा सोनवणे, डहाणू

‘नवरात्रीचे ९ दिवस प्रतिदिन सत्संग ऐकला. तेव्हा मला ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून साक्षात् दुर्गादेवी बोलत आहे’, असे वाटत होते. त्यांची वाणी अमृतवाणी वाटत होती आणि शेवटी स्तोत्र लावल्यावर पुष्कळ भावजागृती होत होती.’

(समाप्त)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक