‘२८ ते ३०.५.२०२४ या कालावधीमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये नवचंडी याग झाला. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘आश्रमामध्ये आल्यानंतर माझा नामजप आणि प्रार्थना पूर्वीपेक्षा चांगल्या होऊन माझी एकाग्रता वाढली.
२. माझ्या मनात जे प्रश्न यायचे, त्यांची समाधानकारक उत्तरे दुसर्या दिवशी मला साधकांच्या माध्यमातून मिळायची. तेव्हा ‘प.पू. डॉक्टरच मला साधकांच्या माध्यमातून उत्तरे देऊन मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटायचे.
३. याग चालू असतांना मला दिवसभर आनंद मिळायचा.
४. ‘सर्वत्र प.पू. डॉक्टरच आहेत’, असे मला वाटायचे.’
– कु. मोहिनी मा. चव्हाण, शेडेगाळी, बेळगाव. (३१.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |