‘मी कर्ता नसून राम कर्ता आहे’, असे म्हणणे महत्त्वाचे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

माझेपण सोडावे म्हणजे ‘मी’चा बोध होतो. ‘भगवंत चहूकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे, तसाच तो दुसर्‍यातही आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतील दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे. ‘मी कर्ता नसून राम कर्ता आहे’, हे म्हटले, म्हणजे त्यात सर्व आले.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज