सोलापूर येथील साधिका सौ. भारती पोगुल आणि त्यांचा मुलगा कु. श्रवण (वय १४ वर्षे) हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. कु. श्रवण आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र आणि आश्रमाच्या परिसरातील श्री भवानीदेवी यांच्या दर्शनाला प्रतिदिन जात असे. त्या वेळी त्याला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून मला ‘ते चित्र सजीव आहे’, असे जाणवले.
२. श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
अ. देवीचे दर्शन घेतांना ‘देवी श्वास घेत आहे आणि तिच्या गळ्यातील हार सरकला आहे’, असे मला जाणवले.
आ. त्यानंतर दुसर्या दिवशी मला देवीच्या मुखमंडलाच्या जागी काही वेळ विठ्ठलाचे मुखमंडल दिसले.’
– कु. श्रवण पोगुल (वय १४ वर्षे), सोलापूर (७.७.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक