समष्टी कल्याणासाठी नवनवीन संकल्पना तत्परतेने राबवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २००२ मध्ये नाशिक येथे एका साधकाच्या घरी सत्संग चालू असतांना एक साधक परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाला, ‘‘माझ्याकडे एका संप्रदायातील श्रीरामाच्या नामजपाची नामधून आहे. ती मी माझ्या घरात नेहमी लावतो. त्यामुळे घर प्रसन्न आणि सात्त्विक झाले आहे.’’ हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाला विचारले, ‘‘हे सूत्र तू लिहून दिलेस का ?’’ तेव्हा तो साधक ‘नाही’, असे म्हणाला. त्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्याला म्हणाले, ‘‘असे वैशिष्ट्यपूर्ण सूत्र लिहून देत जा. आपल्याला त्याचा उपयोग होईल. आपण साधकांच्या आवाजातील देवतांचा नामजप ध्वनीमुद्रित करूया. त्याचा लाभ सर्वांना होईल.’’

श्री. राम होनप

परात्पर गुरु डॉक्टरांनी लगेच एका कागदावर या सूत्राची नोंद करून घेतली. परात्पर गुरु डॉक्टर नाशिकहून गोव्याला गेल्यावर काही कालावधीने सनातन संस्थेच्या वतीने सौ. अंजली मुकुल गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांच्या आवाजात सप्तदेवतांच्या नामजपांचे ध्वनीमुद्रण करण्यात आले. त्याचा लाभ सर्वांना झाला. या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांमधील ‘समष्टीच्या कल्याणाची तळमळ’, ‘सतर्कता’, ‘तत्परता’ आणि ‘निर्णयक्षमता’, हे गुण प्रकर्षाने माझ्या लक्षात आले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक