(‘पॉर्न स्टार’ म्हणजे अश्लील चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री)
ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – बांगलादेशी अश्लील चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री (‘पॉर्न स्टार’) रिया बर्डे हिने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याचे उघड झाले आहे. उल्हासनगरमधील पोलिसांनी तिला कह्यात घेतले आहे. रिया, तिची आई, भाऊ आणि बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने भारतीय नागरिकत्व मिळवले. (भारतात अवैधरित्या वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांचे सूत्रे मागील कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे; मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढला न जाणे यापेक्षा दुर्दैव ते काय ! – संपादक)
Police arrest Bangladeshi ‘porn star’ Riya Barde (Riya Sheikh) for overstaying
📍Ulhasnagar, Mumbai
👉 It is now revealed that the family name of the actress is Sheikh and not Barde.
👉 Deport Illegal Bangladeshi infiltrators now!
👉 Mu$l!m boys and men adopt Hindu names to… pic.twitter.com/1IzufSxajz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 27, 2024
१. पोलिसांच्या अन्वेषणात रियाची आई आणि वडील कतारमध्ये वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिया उल्हासनगरमध्ये बहीण-भावासमवेत रहात होती. त्या दोघांचा शोध चालू आहे.
२. रियाला याआधीही वेश्याव्यवसाय प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. (तिच्यावर त्या वेळीच पोलिसांनी कारवाई का केली नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतात अवैधरित्या रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना भारतातून हाकलून द्यायला हवे ! |
बर्डे नाव धारण करणारे कुटुंब मूळचे शेख असल्याचे उघड !रियाची आई अंजली बर्डे उपाख्य रुबी शेख हिने अमरावतीतील अरविंद बर्डे यांच्याशी विवाह केला होता. रियाचा भाऊ रवींद्र उपाख्य रियाज शेख आणि बहीण रितू उपाख्य मोनी शेख हे संपूर्ण कुटुंबच बर्डे नाव धारण करून रहात होते. संपादकीय भूमिकाभारतातील मुसलमान हिंदु नावे धारण करून हिंदु युवतींना फसवतात, तर बांगलादेशी घुसखोर हिंदु नाव आणि आडनाव धारण करून स्वतःची कुकृत्ये लपवतात ! |