‘मला एके दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आठवण येऊन १० ते १५ मिनिटे माझा भाव पुष्कळ जागृत झाला. त्यानंतर माझ्या मनात ‘मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची पुष्कळ वेळ आठवण येऊन माझी भावजागृती झाली आणि माझे मन त्यांच्या स्मरणाने व्याकुळ झाले’, अशा आशयाचे विचार येऊन माझे मन सुखावले आणि मी अल्पसंतुष्ट झालो.
त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना १० – १५ मिनिटे भावजागृती होऊन समाधान मानणारा दीप आवडेल कि त्यांनी सांगितलेली साधना सतत आचरणात आणण्यासाठी धडपडणारा दीप आवडेल ?’ या विचाराच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी मला अंतर्मुख केले. तेव्हा मला जाणीव झाली, ‘साधकांच्या मनातील विचारांकडे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे लक्ष असते आणि ते साधकांना योग्य दिशा देण्यास सदोदित तत्पर असतात.’
– श्री. दीप संतोष पाटणे (वय २३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२४)