पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
गुण गावेत संतांचे । पाप दहन कर्माचे ।। १ ।।
संत म्हणजे भगवंत । त्यांच्या कृपेने व्हावे मुक्त ।। २ ।।
गुरुसेवेत दक्ष व्हावे । सर्वभावे शरण जावे ।। ३ ।।
गुरु ज्ञानाचे अधिकारी । आपुल्या सम शिष्य करी ।। ४ ।।
धन्य धन्य गुरुमाऊली । जन्म मृत्यू वाट खुंटली ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)