बांगलादेशामधील हिदूंवरील अत्याचार म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती !

५ ऑगस्ट २०२४ या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र देऊन त्यांचा देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्या वेळी धर्मांधांकडून या उपखंडातील हिंदूंना सहस्रो वर्षे रानटीपणाने लुटण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. बांगलादेशामधील रस्त्यांवर ओकलेल्या जहाल धार्मिक विषाच्या पार्श्वभूमीवरून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी प्रगती करूनही या काही लोकांची मते पालटलेली नाहीत, हे लक्षात येते. हे लोक अजूनही ‘पृथ्वी सपाट आहे आणि जे यावर विश्वास ठेवून त्याचा जगभर प्रसार करत नाहीत, ते नष्ट होण्याचा योग्यतेचे आहेत’, असा आग्रह धरत आहेत. या उपखंडाच्या इतिहासात सहस्रो वर्षे खोलवर रुजलेल्या दुष्प्रवृत्तीची कल्पना येते.

१. बांगलादेशातील हिंदूंना हिंदूबहुल देशांचा पाठिंबा नाही !

बांगलादेशात हिंदूंची प्रार्थनास्थळे आणि व्यवसायाची ठिकाणे जळत आहेत. संकुचित कट्टरतेपलीकडे न जाणार्‍या या दुष्प्रवृत्तींना बांगलादेशातील हिंदू शौर्याने जाब विचारत आहेत. त्यांना त्यांच्या बाजूने उभे रहाणार्‍या हिंदूबहुल देशाचा पाठिंबा नाही; कारण जगामध्ये सध्या हिंदू विचारधारेवर चालणारे देशच नाहीत. नेपाळ हे शेवटचे ‘हिंदु राष्ट्र’ही आता ‘धर्मनिरपेक्ष (सेक्युलर)’ झाले आहे. ‘सनातन धर्मामध्ये धर्मनिरेपक्षता जन्मजातच आहे’, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे हिंदूबहुल देशामध्ये किंवा हिंदूंमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला विरोध झाला नाही.

बांगलादेशामध्ये घडलेल्या घटनांवरून या गोष्टीच्या २ वेगळ्या बाजू दिसून येतात. ‘मानव सेवा माधव सेवा’ या सनातन धर्मातील तत्त्वावर चालणार्‍या आणि प्रसाद घेणार्‍यांचे धर्मांतर करण्याची इच्छा न बाळगता शांतपणे कित्येक दशके लाखो लोकांना अन्नदान करणार्‍या बांगलादेशामधील ‘इस्कॉन’च्या मंदिराची नासधूस करून ते जाळण्यात आले. ही दृश्ये या धर्मांध, रानटी लोकांनी जगभरातील मंदिरे लुटणे, त्यांची नासधूस करून ती नष्ट करणे आणि विश्वविद्यालये जाळणे यांविषयीच्या स्मृती पुनरुज्जीवित करतात. भारतीय उपखंडाचा इतिहास शेकडो वर्षे अशा प्रकारच्या झालेल्या आक्रमणांनी भरलेला आहे. त्यामध्ये महिलांना लैंगिक गुलाम म्हणून वापरण्याचाही अंतर्भाव आहे आणि दुर्दैवाने ते अजूनही अखंड चालू आहे.

२. मुसलमानांचा इतिहास रक्तरंजित

‘जे आपला भूतकाळ आठवू शकत नाहीत आणि पुनरावृत्ती करतात, त्यांचा निषेध केला पाहिजे’, हे जॉर्ज संतायन यांनी म्हटले आहे, ते योग्य आहे. हे लक्षात ठेवून भारतीय उपखंडातील धार्मिक अत्याचाराचा इतिहास पडताळून पहाणे महत्त्वाचे आहे. विल ड्युरांट यांचे ‘स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’, हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या प्रसिद्ध पुस्तकातील ‘द मोस्लेम कॉन्क्वेस्ट’ या चौथ्या प्रकरणामध्ये त्यांनी हिंदूंच्या दुर्दशेविषयी निरीक्षणे नमूद केली आहेत. त्यांनी म्हटले आहे, ‘मुसलमानांनी भारतावर मिळवलेल्या विजयाचा इतिहास रक्तरंजित आहे. सभ्यता ही अनिश्चित गोष्ट आहे. सुव्यवस्था, स्वातंत्र्य, संस्कृती आणि शांतता हे सर्व आक्रमण करणार्‍या रानटी लोकांकडून कधीही उलथून टाकले जाऊ शकते.’

विल ड्युरांट यांनी हे पुस्तक मार्च १९३५ मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र झाले. अशा प्रकारच्या घटना भारतातही घडू शकतात, अशी हलकी चेतावणी आपल्या काही राजकारण्यांनी दिली आहे. यापूर्वी भारताने कधीही धार्मिक कट्टरतावादाला मान्यता दिलेली नाही आणि भारत अशी परिस्थिती कौशल्याने हाताळू शकतो, असा मला विश्वास आहे.

अधिवक्ता श्रीधर पोतराजू

३. तथाकथित मानवाधिकार संस्थांचे पितळ उघडे

एका बाजूने सहस्रो वर्षांपासून हिंदूंना लक्ष्य करून होत असलेला धार्मिक रानटीपणा आणि दुसर्‍या बाजूने बांगलादेशामधील हिंदूंनी दाखवलेला आशावाद आणि धैर्य. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बांगलादेशामधील रस्त्यांवर येऊन हिंदूंनी मंदिरांच्या विध्वंसाला रस्त्यावर उतरून विरोध केला. प्रत्येक माणसाला असलेल्या जीवन जगण्याच्या अधिकाराची ते मागणी करत आहेत. बांगलादेशातील हिंदू त्यांना लक्ष्य करून घडवण्यात येणार्‍या हिंसाचाराच्या विरोधात धैर्याने उभे आहेत. बांगलादेशामधील पीडित हिंदूंना जगभरातील हिंदु संस्थांकडून आणि समजूतदार नागरिकांकडून काही प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे.

या वेळी वैचारिकदृष्ट्या भरकटलेल्या मानवाधिकार संस्था आणि त्यांचे पोकळ दावे यांचे पितळ उघडे पडले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा आणि मानव हक्कांविषयीच्या जागतिक घोषणा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत कित्येक पिढ्या रहाणार्‍या तेथील अल्पसंख्य हिंदूंचा विषय येतो, तेव्हा प्रत्यक्षात केवळ कागदावरील उपाययोजना ठरतात.

४. इतरांना जगण्याचा हक्क नाही ?

अमेरिकेच्या भूमीवर आणि बांगलादेशामध्ये चाललेल्या द्वेष पसवण्याच्या मोहिमांतून एक समान अर्थ निघतो, तो म्हणजे ‘धर्मांधांनी दया दाखवल्याविना इतरांना जगण्याचा हक्क नाही’, या जागतिक दृश्याला मान्यता देत आहेत. ते ‘इस्लाम न मानणार्‍यांना नष्ट करण्यासाठी हिंसाचार करणे’, हे कायदेशीर आहे, असे मानत आहेत. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत द्वेषाला आपलेसे करून धर्मावर आधारित नरसंहाराला पाठिंबा दिला जाणे आणि बांगलादेशातील घटनांविषयी भारतातील अन् विदेशातील मानवाधिकार संघटनांनी पाळलेले मौन हा काही योगायोग असू शकत नाही. मानवाधिकाराविषयी त्यांच्या तथाकथित भावना बोथट  करण्यासाठी त्यांना आर्थिक आमीष दाखवलेले असू शकते.

– ज्येष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्च न्यायालय.(१२.८.२०२४)

आसाम, बंगाल आदी राज्यांतील राष्ट्रद्रोही धर्मांधांनी बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास आणि उद्या यांनीच भारतात आतंकवादी घटना घडवून आणल्यास आश्चर्य वाटू नये !

‘आम्ही बांगलादेशी हिंदू आमची दैन्यावस्था शब्दांत मांडू शकत नाही. आमच्यावर विविध प्रकारची संकटे आहेत. गेल्या महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होतील, या भयापोटी भारतात पलायन केले आहे. यामध्ये अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते, तसेच ‘अवामी लीग पक्षा’चे कार्यकर्ते आणि ‘अन्सारुल्ला बांगला टीम’ या आतंकवादी संघटनेचे सदस्य यांचा समावेश आहे. ‘भारत – बांगलादेश सीमा अत्यंत असुरक्षित असल्याचेच यातून म्हणता येईल’, असे मत बांगलादेशातील एका युवक हिंदु नेत्याने व्यक्त केले. तो ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी तेथील हिंदूंच्या दूरवस्थेविषयी बोलत होता.

या नेत्याने मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे अशी !

अ. माझा मोठा भाऊ हिंदुत्वनिष्ठ पत्रकार असून प्राण वाचवण्यसाठी तो काही वर्षांपासून आसाममधील गौहत्तीत रहात आहे. त्याला आम्ही भेटूही शकत नाही.

आ. ‘अवामी लीग’चे उत्तर सुनामगंज येथील हिंदु खासदार रणजीत चंद्र सरकार यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी बांगलादेश सोडून केव्हाच पलायन केले आहे.

इ. कोमिला येथील ‘अवामी लीग’चा खासदार बहाऊद्दीन बहार हाही कोलकाता येथे रहात असून त्याने गेल्या वर्षी दुर्गादेवीच्या उत्सवावर अश्लाघ्य टीका केली होती. त्याने म्हटले होते की, दुर्गा उत्सव म्हणजे मद्याचा उत्सव !

ई. आज ‘जमात-ए-इस्लामी’ आणि ‘अन्सारुल्ला बांगला टीम’चे आतंकवादी भारतातील गौहत्ती, कोलकाता, तसेच मेघालय येथे लपून बसले आहेत.

उ. बांगलादेशातील पोलीस खात्यात हिंदु समुदायाचे वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची कारणे शोधली जात आहेत. या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूंना असाहाय्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे.’ (१८.९.२०२४)

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक