मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात एस्.टी. महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात अनेक प्रवासी गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता बस उलटल्याने ही दुर्घटना घडली. बचावकार्य चालू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घायाळ झालेल्यांना तातडीने योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना परिवहन विभागाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना तातडीने १० लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे आदेशही त्यांनी दिले. ‘घायाळ झालेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च सरकार करणार असून मृतांचा आकडा वाढू नये, यासाठी प्रयत्न करा’, अशी सूचनाही त्यांनी दिली.