स्वामी विवेकानंद यांची शिकवण
असे झाल्यास जगातून समस्त आध्यात्मिकता नाहीशी होईल, सारी नैतिकता पूर्णतः नष्ट होईल, धर्माविषयीची सारी मधुर सहानुभूती संपूर्ण लोप पावेल आणि सर्व प्रकारचा उच्च आदर्शवाद अस्तंगत होऊन जाईल अन् मग त्यांच्या स्थानी कामरूपीदेव आणि विलासितारूपी देवी या युगुलाचे साम्राज्य चालू होऊन पैसा होईल. त्यांच्या जागी फसवेगिरी, जुलूम, बळजोरी आणि स्पर्धा या होतील, त्यांच्या उपासनेच्या पद्धती आणि अनुष्ठाने अन् मानवात्मा होईल त्यांचा बळी ! नाही, नाही. असली घटना कधीही घडून येणार नाही, कर्म करण्याच्या शक्तीहून दुःख सहन करण्याची शक्ती अनंतपटीने श्रेष्ठ असून द्वेषाच्या शक्तीहून प्रेमाची शक्ती अनंतपटींनी प्रभावी असते.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)