कोल्हापूर – जिल्ह्यात पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ गवत, वेली, झुडपे, झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही वेळा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होत होता. ही गोष्ट लक्षात घेत कोल्हापूर मंडल कार्यालयाकडून जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून प्रारंभी झालेली मोहीम अद्याप चालू असून महावितरणने १० दिवसांत ५ सहस्र ९०२ स्पेसर्स बसवले असून ४०३ वीज तारांचे ताण काढले आहेत. आवश्यकेनुसार वृक्षांच्या फाद्यांची छाटणी करण्यात आली आहे. ग्राहकांनी यंत्रणेविषयीची तक्रार नोंदवल्यास त्यास प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश कर्मचार्यांना दिले आहेत, असे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितले आहे.
वीज यंत्रणेविषयी ग्राहकांना कोणतीही तक्रार करायची असल्यास ते महावितरणच्या २४ घंटे चालू असणार्या ‘टोल फ्री’ क्रमांक १९१२/१८००-२१२-३४३५, तसेच ७८७५७६९१०३ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर संपर्क साधू शकतात.