S Jaishankar On China Army : लडाखमध्‍ये घुसखोरी केलेले चीनचे ७५ टक्‍के सैन्‍य माघारी ! – परराष्‍ट्रमंत्री

परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जिनेव्‍हा (स्‍वित्‍झर्लंड) – पूर्व लडाख भागामध्‍ये घुसखोरी केलेले चीनचे ७५ टक्‍के सैन्‍य माघारी गेले असल्‍याची माहिती परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर(Dr. S. Jaishankar) यांनी नुकतीच दिली. जिनेव्‍हामध्‍ये आयोजित एका मुलाखतीत त्‍यांनी चीनसोबत चालू असलेल्‍या चर्चेविषयी माहिती दिली.

परराष्‍ट्रमंत्री म्‍हणाले की, गलवान खोर्‍यामध्‍ये जून २०२०मध्‍ये झालेल्‍या संघर्षामुळे भारत आणि चीन यांच्‍या संबंधांवर परिणाम झाला. सीमेवर हिंसा होत असतांना द्विपक्षीय संबंधांवर त्‍याचा परिणाम होतो. या परिस्‍थितीवर उपाय शोधण्‍यासाठी दोन्‍ही बाजूंच्‍या वाटाघाटी चालू आहेत. सीमावादावर तोडगा निघाला, तर दोन्‍ही देशांमधले संबंध सुधारतील, असेही परराष्‍ट्रमंत्र्यांनी सूचित केले.

संपूर्ण सैन्‍य माघारीवर सहमती ! – अजित डोवाल

राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

नवी देहली – लडाख सीमेवरून भारत आणि चीन या दोन्‍ही देशांनी सर्व सैन्‍य माघारी घेण्‍यासाठी १२ सप्‍टेंबर या दिवशी सहमती झाल्‍याची माहिती राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिली. रशियाच्‍या दौर्‍यावर असलेल्‍या राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्‍ट्रमंत्री वँग यी यांची सेंट पीटर्सबर्ग येथे भेट घेतली. त्‍यावेळी सैन्‍य माघारीसाठी तातडीने आणि दुप्‍पट प्रयत्न करण्‍यावर सहमती झाल्‍याचे अजित डोवाल यांनी सांगितले.