
ढाका (बांगलादेश) – अमेरिकेने बांगलादेशावर ३७ टक्के इतका मोठा व्यापार कर लादला आहे. यामुळे बांगलादेशाने म्हटले की, आम्ही अमेरिकेतून आयात होणार्या वस्तूंवरील शुल्कांचा आढावा घेत आहेत. बांगलादेशाचे राष्ट्रीय महसूल मंडळ लवकरच यावर पर्याय शोधेल. अमेरिका आमचा जवळचा मित्र आणि सर्वांत मोठा निर्यात बाजार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही अमेरिकी सरकारसमवेत काम करत आहोत.
स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलू ! – चीन
चीनसाठी अमेरिका त्याचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक व्यापारी भागीदार या निर्णयावर अप्रसन्न आहेत. अमेरिकेने शुल्क उठवावे. चीन स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलेल.