सांगली, ९ सप्टेंबर (वार्ता.) – शिवकाळापासून चालत आलेल्या लेझीम या पारंपरिक मैदानी आणि मर्दानी खेळांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या खेळाला गतवैभव प्राप्त व्हावे आणि महाराष्ट्राची संस्कृती जतन व्हावी, या उद्देशाने येथील विजयंत मंडळाने गणेशोत्सवानिमित्त खुल्या पारंपरिक लेझीम स्पर्धेचे आयोजन केले आहे. १० सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ४ वाजता या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे २१ सहस्र रुपये, द्वितीय क्रमांकाला १५ सहस्र रुपये, तृतीय क्रमांकाला १० सहस्र रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला ५ सहस्र रुपये, तसेच चषक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत भाग घेणार्यांनी अमृत सूर्यवंशी (७०६६२७३२०५) यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.