‘अब्दुललाट’ गावाचे नामांतर ‘अमृतलाट’ करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने संमत !

कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

 ‘अब्दुल’लाटचे नामांतर ‘अमृत’लाट करण्याचा ठराव संमत करतांना ग्रामस्थ

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील ‘अब्दुल’लाटचे नामांतर ‘अमृत’लाट करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने संमत करण्यात आला. या ठरावाच्या प्रसंगी प्रचंड गदारोळ आणि वादळी चर्चा झाली. या नावासाठी तरुण, महिला, युवती, ग्रामस्थ यांनी जोरदार समर्थन दर्शवले. काहींनी विरोध करत ‘यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात यावी आणि निर्णय घ्यावा’, अशी मागणी केली.

या गावचे नाव ‘अब्दुल’ नावाच्या सेनापतीच्या नावावरून पडले, असे सांगितले जाते. हा सेनापती विजापूरच्या आदिलशाहीचा हस्तक म्हणून या ठिकाणी नियुक्त होता. पूर्वी त्याच्यावर ‘लाट’ गावात टेहाळणी करणे, हेरगिरी करणे, जाचक कर वसुली करणे अशी अनेक दायित्वे होती. त्याच्याकडून येथील जनतेवर अत्याचार केला जात असे. त्यामुळे हे नाव नको, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गावाचे प्राचीन नाव ‘अवलदुर्ग’ असल्याचेही सांगितले जाते. आजही येथे काहीजण प्रवचन करतांना ‘अमृतलाट’ असाच उल्लेख करतात. त्यामुळे अमृतलाटसाठी कुणीही अपसमज करून घेऊ नये, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

आक्रमकांची नावे पुसून स्वकीयांची नावे देण्याची मागणी करणार्‍या ‘अमृतलाट’ वासियांचे अभिनंदन !

गाव, तालुका, मार्ग यांना दिलेली धर्मांधांची सर्व नावे पालटण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धोरण ठरवून एकदमच सर्व पालटणे आवश्यक !