Ukraine drone attack : युक्रेनचे १५० हून अधिक ड्रोनद्वारे रशियाच्या १५ प्रांतांवर आक्रमण !

  • मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला केले लक्ष्य

  • रशियाने प्रत्युत्तरात खार्किव येथे क्षेपणास्त्रे डागली

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

मॉस्को – युक्रेनने (Ukraine) १५० हून अधिक ड्रोनद्वारे (drones) रशियावर(Russia) आक्रमण केले. अडीच वर्षांपासून चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात प्रथमच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे रशियावर आक्रमण केले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोनद्वारे आक्रमण केले.

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरावर ११ ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणामध्ये तेल शुद्धीकरण केंद्र आणि एका तांत्रिक कक्ष यांना लक्ष्य करण्यात आले. तेल शुद्धीकरण केंद्रावर आक्रमणानंतर तेथे स्फोट झाला. रशियन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने रशियाच्या १५ प्रांतांवर १५८ ड्रोनद्वारे आक्रमण केले. ते म्हणाले की, रशियाच्या हवाईदलाने जवळजवळ सर्व ड्रोन पाडले. या आक्रमणात कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. या आक्रमणाविषयी युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

रशियाचे प्रत्युत्तर

युक्रेनने केलेल्या आक्रमणानंतर रशियाने युक्रेनचे दुसरे मोठे शहर खार्किववर बॅलेस्टिक क्षेपणासस्त्रे आणि बाँब यांचा अक्षरशः पाऊस पाडला. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, या आक्रमणात किमान ४७ लोक घायाळ झाले. त्यात ५ मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर युक्रेनमधील खार्किव येथे रशियाने क्षेपणास्त्राद्वारे केलेल्या आक्रमणात गॅस पाईपचा स्फोट झाला. रशियाने खार्किवमध्ये १० ठिकाणी स्फोट केले. रशियाने ४८ घंट्यांत केलेले हे दुसरे मोठे आक्रमण होते. या आक्रमणात १२ मजली निवासी इमारत आणि मुलांचे उद्यान उद्ध्वस्त झाले. १३ लाख लोकसंख्या असलेले हे शहर रशियाच्या सीमेपासून अवघ्या २५ मैलांवर आहे.

युक्रेनला रशियात घुसून करायचे आहे आक्रमण !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांना रशियात घुसून आक्रमण करायचे आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, झेलेंस्की ासाठी अमेरिकेवरही साहाय्यासाठी दबाव आणत आहेत.