पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
राजूदादा (टीप) सर्वांचा आवडता । त्याची होती ईश्वरावर सत्ता ।। १ ।।
सर्व माया मोहास त्यागून । सर्वभावे केला ईश्वर प्रसन्न ।। २ ।।
जन्मा येणे जाणे पूर्ण संपले । सेवाभावे नर जन्म सार्थक केले ।। ३ ।।
जो सर्वांना होता हवाहवासा । तो ईश्वराने केला आपलासा ।। ४ ।।
धोंडिबा म्हणे असे महान संत । जड जिवासाठी जगी अवतरतात ।। ५ ।।
टीप – सनातनचे दिवंगत साधक कै. राजाराम चौगले (वर्ष २०१४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)