ज्ञान, भक्ती, श्रद्धा, ध्यान आणि आत्मज्ञान यांचे महत्त्व

आद्यशंकराचार्य

काशीक्षेत्र शरीरं, त्रिभुवनजननी व्यापिनी ज्ञानगंगा,
भक्तिश्रद्धा गया इयं निजगुरुचरणध्यानयोगः प्रयागः ।

विश्वेशोऽयं तुरीयः सकलजनमनः साक्षिभूतोऽन्तरात्मा,
देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्तीर्थम् अन्यत् किम् अस्ति ? ॥

– शंकराचार्य – काशीपञ्ञकम्

अर्थ : ‘‘(माझे) शरीर हे काशीक्षेत्र, त्रैलोक्याची माता आणि सर्वव्यापक अशी ज्ञानरूपी गंगा, भक्तीयुक्त श्रद्धा ही गया, आपल्या गुरुचरणांचे ध्यानरूपी योगसाधन हेच प्रयाग, सर्व लोकांच्या मनात साक्षीभूत असलेला विश्वाचा स्वामी तुरीयावस्थेतील अंतरात्मा, हे सर्व जर माझ्या शरिरात निवास करत आहे, मग पुन्हा इतर तीर्थक्षेत्र कोणते ?’’

ज्ञान, भक्ती, श्रद्धा, ध्यान, आत्मज्ञान या अंतर्गत गोष्टींचे महत्त्व तीर्थक्षेत्रांपेक्षा अधिक आहे.