नाशिक – सिडको परिसरात एका मुलीच्या आईने तिला छेडणार्या मुलाला चोप दिला. शेजारून जाणार्या भंगारवाल्याच्या गाडीतील खुर्ची उचलूनही तिने त्याला मारले. या वेळी चौघे जण होते. तरीही ती महिला जराही घाबरली नाही. या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवशक्ती नगर परिसरात रस्त्यावर उभे राहून धर्मांध आणि त्याच्यासमवेतची मुले मुलीची छेड काढत असत. मुलीने ही गोष्ट घरी सांगितल्यावर तिच्या आईने टवाळखोराला जाब विचारला. त्याने हुज्जत घालण्यास आरंभ केल्यावर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून टवाळखोरांना चोप दिला.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. चार संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
संपादकीय भुमिकाअशा रणरागिणी सर्वत्र हव्यात ! |