श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – तालुक्यातील गोंडेगाव येथील राजेंद्र लोखंडे यांच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या जातीविषयी अपशब्द बोलून, त्याला भीती दाखवून त्याचे धर्मांतर करण्याचा प्रकार झाला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह शोएब शकील सय्यद याच्यावर गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
१३ वर्षांच्या मुलाच्या वयाचा अपलाभ घेत या दोघांनी त्याला फूस लावून मुसलमान धर्मात येण्यासाठी नमाजपठण, अजान करण्यास शिकवले. असे न केल्यास त्याला मारून टाकण्याची धमकी दिल्याचे मुलाच्या पालकांनी सांगितले. ७ महिन्यांपासून हा प्रकार चालू होता. या प्रकरणी राजेंद्र लोखंडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
गोंडेगाव येथे काही दिवसांपूर्वीच आराध्य दैवत श्री गणपति मंदिराच्या चौथर्यावर काळ्या पिशवीत मांस आढळल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी ‘गाव बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले. (अशा पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) त्यामुळे गावकरी आणखी आक्रमक झाले. चौकशीअंती तपासाची चक्रे फिरवून काही व्यक्तींचे पोलीस प्रशासनाने जबाब नोंदवले. त्यावरून हा प्रकार उघड झाला.
संपादकीय भूमिकामुसलमान धर्मात येण्यासाठी बाळजोरीने नमाजपठण, अजान करण्यास शिकवले ! हिंदूंनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या ! अशा घटना थांबण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’चा कायदा लागू करण्याची मागणी संघटितपणे करा ! |