अमेरिकेने बलुचिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांचा केला निषेध !
न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या फुटीरतावादी गटाने केलेल्या आक्रमणात १३० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. या घटनेचा अमेरिकेने निषेध केला आहे. अमेरिकेने म्हटले की, आतंकवादाविरुद्धच्या लढ्यात आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दक्षिण आणि मध्य आशियाई प्रकरणाच्या कार्यालयाच्या ‘एक्स’वरील खात्यावरून हे वक्तव्य करण्यात आले. अमेरिकेने पुढे म्हटले की, शांतता आणि स्थिरता बिघडवणारी कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही.
The United States strongly condemns the multiple attacks in Pakistan’s Balochistan province which took many lives. Any violence disrupting peace and stability is indefensible. We stand with Pakistan in its fight against terrorism and we send our deepest condolences to those who…
— State_SCA (@State_SCA) August 27, 2024
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात २६ ऑगस्टला बंडखोरांनी महामार्ग, रेल्वे पूल आणि पोलीस ठाणी यांवर आक्रमणे केली होती. त्यांमध्ये १३० पाकिस्तानी सैनिक मारले गेले.
संपादकीय भूमिकायाला म्हणतात उंदराला मांजराची साक्ष ! जिहादी आतंकवादाचा उगम पाकिस्तानात झाला आहे, तर रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने ‘अल्-कायदा’सारख्या जिहादी आतंकवादी संघटनेला मोठे केले. हे दोघे एकमेकांना साहाय्यच करणार, यात काय आश्चर्य ? |