३० दिवसांत गाव रिकामे करण्यास सांगितले !
पाटलीपुत्र (बिहार) : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयका’ला जोरदार विरोध केल्यानंतर बिहारमधील वक्फ बोर्ड सक्रीय झाले आहे. ‘बिहार राज्य सुन्नी वक्फ बोर्डा’ने पाटलीपुत्र जिल्ह्यातील फतुहा येथे असलेल्या गोविंदपूर गावावर त्याचा दावा सांगितला आहे. ३० दिवसांत गाव रिकामे करण्याचा आदेशच बोर्डाने काढला आहे. या गावात ९५ टक्के लोक हे हिंदू असून ते यामुळे चिंतित आहेत.
Order from Waqf Board to vacate Govindpur (Bihar), a village with 95% Hindu Population.
🚨Villagers asked to vacate within 30 Days!
The Waqf Board holds the largest amount of land in the country after the military and railways.
🔴The Waqf Board should be declared… pic.twitter.com/qvXHjtmhWC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 25, 2024
ही भूमी आमच्या मालकीची असून वक्फ बोर्डाचा दावा पूर्णपणे चुकीचा आणि निराधार असल्याचे येथील हिंदूंचे म्हणणे आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तपास केला असता, भूमीवर गावकर्यांचा वडिलोपार्जित अधिकार असल्याचे आणि वक्फ बोर्डाचा दावा खोटा असल्याचे आढळून आले.
वक्फ कायद्याची भयावहता जाणा !अमर्याद अधिकारांचा लाभ उठवत वक्फ बोर्डाने अवघ्या १३ वर्षांत त्याच्या कह्यातील भूमीचे क्षेत्रफळ दुप्पट केले आहे. भारताच्या वक्फ व्यवस्थापन प्रणालीनुसार देशातील सर्व वक्फ बोर्डांकडे एकूण ८ लाख ५४ सहस्र ५०९ मालमत्ता आहेत. या मालमत्ता ८ लाख एकरपेक्षा अधिक भूमीवर पसरल्या आहेत. |
हिंदु गावकर्यांची भूमिका !
गोविंदपूर गावातील वक्फ बोर्डाने अचानक ही भूमी त्यांची असल्याचा दावा केल्याचे बोलले जात आहे. ही भूमी वर्ष १९५९ पासून स्वतःच्या कह्यात असल्याचा दावा बोर्डाने केला आहे, तर येथे रहाणार्या हिंदु गावकर्यांनी वक्फ बोर्डाच्या दाव्याचे पूर्णपणे खंडण केले असून, ‘आम्ही वर्ष १९०९ पासून येथे रहात असून या भूमीची कागदपत्रेही आमच्या नावावर आहेत’, असे म्हटले आहे. गावकर्यांचे म्हणणे आहे की, या वर्षीही उच्च न्यायालयाने भूमीच्या वादात आमच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतरही वक्फ बोर्ड या भूमीवर स्वतःचा दावा सांगत आहे. वक्फ बोर्ड या भूमीवरील दाव्यासंदर्भात कोणतेही कागदपत्र सादर करू शकलेले नाही.
संपादकीय भूमिका
|