मुंबई – अहिल्यानगर येथील महंत रामगिरी महाराज यांचे छायाचित्र आणि त्याखाली ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) असे लिखाण असलेला भ्रमणभाषचा ‘स्टेटस’ ठेवणार्या पालघर येथील धर्मांध डॉ. महंमद साद याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नालासोपारा येथील श्री. राजेश पाल यांनी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
त्याने महंत रामगिरी महाराज यांच्या तोंडावर फाळे लावलेले छायाचित्र ठेवले होते. ‘मूत्र पिणे आणि शेण खाणार्यांनी आमच्या हुजूरविषयी बोलणार्या ‘सर तन से जुदा’ ही एकच शिक्षा आहे’, अशा आशयाचे लिखाण केले आहे. महाराज यांच्या छायाचित्राखाली ‘#ARRESTRAMGIRI’ असे लिहिले आहे.