मालाड (मुंबई) येथे राष्ट्रध्वज उखडणार्‍या नाझिया अंसारी हिच्या विरोधात पोलिसात तक्रार !

रहिवाशांना धमकी आणि शिवीगाळ

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई – स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकावला, याचा राग येऊन तो उखडून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या येथील नाझिया अंसारी या महिलेच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

१. परिसरातील रहिवासी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन हे वर्ष २०१६ पासून साजरे करत आहेत. काही काळ अब्दुल कादिर अंसारी हे तेथील समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय विविध सामाजिक कार्यक्रमांत स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. दोनही राष्ट्रीय दिवसांना ते रहिवाशांचा विरोध करून अडथळा निर्माण करतात.

२. १५ ऑगस्टला त्यांनी रहिवाशांना शिवीगाळ करत धमकी दिली. अन्सारी यांची सून नाझिया अंसारी (नंदू) आणि मुलगा रहमान अंसारी यांनी त्या दिवशी झालेल्या ध्वजारोहणावर आक्षेप घेतला.

३. ‘झेंडा स्वतःच्या घरी जाऊन लाव’, असे म्हणत आणि अर्वाच्च शिवीगाळ करत नाझिया हिने उपस्थितांना शिवीगाळ केली. ‘पोलिसांनी नाझियावर उचित कारवाई करावी’, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (केवळ मागणी नको, तर महिलेवर कारवाई होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

राष्ट्रध्वज उखडला जाण्याला हा काय पाकिस्तान आहे का ? सर्वत्रच्या राष्ट्रप्रेमींनी संघटित होऊन असे राष्ट्रविरोधी कृत्य करणार्‍यांना वेळीच खडसवायला हवे, तसेच त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !