भारत बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठीचा एक उपाय !

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

‘बांगलादेशातील हिंदूंची घरे जाळून आक्रमणकर्ते भारताला निश्चितपणे चिथावणी देत आहेत. वर्ष १९४७ मध्ये बांगलादेशात २४ टक्के हिंदू होते. सध्या त्यांची संख्या न्यून होऊन आता ती केवळ ८ टक्के राहिली आहे. त्यामुळे अन्य १६ टक्के हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले, काहींना मारण्यात आले आणि काही पलायन करून भारतात आश्रयाला आले आहेत. आता शिल्लक राहिलेल्या दीड कोटी हिंदूंच्या विरोधातही तीच कारवाई केली जात आहे. त्यामुळे भारतासाठी ही निश्चितच चेतावणी आहे, असे म्हटले पाहिजे.

भारत बांगलादेशात जाऊन हिंदूंचे रक्षण करू शकतो का ?, तर त्याचे उत्तर ‘नाही’, असे आहे. भारत बांगलादेशातील सैन्यावर केवळ दबाव टाकू शकतो; पण जे सैन्य त्यांचे पंतप्रधान आणि अवामी लीगचे नेते यांना वाचवू शकले नाही, ते हिंदूंना कसे वाचवतील ?, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे. यासमवेतच जे हिंदू भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आश्रय दिला पाहिजे. अन्यथा ते सर्व मारले जातील आणि त्यांच्या महिलांवर अत्याचार होतील, तसेच त्यांच्या भूमीही कह्यात घेण्यात येतील.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.