कोलकात्यामध्ये राजकीय पक्षांकडून निदर्शने !
कोलकाता (बंगाल) – येथील सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. या डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृणपणे ठार करण्यात आल्याचे दिसून आले आहे. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. कोलकाता पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. या हत्येविषयी वैद्यकीय विद्यार्थी, भाजप, काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी कारवाईच्या मागणीसाठी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृत महिलेच्या पालकांशी दूरभाषवरून चर्चा केली. दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
भाजप माहिती-तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख आणि बंगाल भाजपचे सहप्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हे प्रकरण दडपल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, महिलांवरील गुन्ह्यांकडे बंगाल किती काळ डोळेझाक करत रहाणार ?
संपादकीय भूमिकाबलात्कार्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत वासनांधांवर वचक बसणार नाही ! |