
‘२५ वर्षांपूर्वी मी मुंबई सेवाकेंद्रात असतांना एकदा साधकाकडून बँकेचे ‘चेकबुक’ गहाळ झाले. त्याला ते कुठे ठेवले, ते काही केल्या आठवतच नव्हते. प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना पुन्हा सगळीकडे पहाण्यास सांगितले; मात्र ते ‘चेकबुक’ काही मिळत नव्हते.

अखेरचा पर्याय म्हणून प.पू. डॉक्टरांनी ध्यानात जाऊन ते ‘चेकबुक’ कुठे ठेवलेले आहे, हे सांगितले. त्यानुसार पाहिल्यावर ते ‘चेकबुक’ सापडले. या वेळी प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना बोलावले आणि सांगितले, ‘‘तुम्ही साहित्य व्यवस्थित न ठेवल्यामुळे माझी ३ मासांची साधना एक ‘चेकबुक’ शोधण्यासाठी व्यय (खर्च) झाली. साधना अशी व्यर्थ व्यय न होण्यासाठी सर्व साहित्य आणि कागदपत्रे वेळच्या वेळी ठरलेल्या जागीच ठेवावीत.’
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
(प.पू. डॉक्टरांनी असे २० ते २५ वर्षांपूर्वी क्वचितच केले. नंतर कधीच केले नाही. – संकलक)