कोल्हापूर – अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर आणि करवीरनिवासिनी पुरोहित मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे ९ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता मंगलधाम हॉल, बिनखांबी गणेश मंदिराजवळ श्रावणी (यज्ञोपवित धारण) संस्कार सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व पोटशाखांतील बांधवांनी उपस्थित रहावे. त्यासाठी पूर्वनोंदणी करण्यासाठी संस्थेच्या ८४८४८ ५१५९१ या क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, तरी अधिकाधिक ज्ञाती बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कोडोलीकर आणि कार्यवाह श्री. श्रीकांत लिमये यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > ९ ऑगस्ट या दिवशी श्रावणी संस्कार सोहळ्याचे आयोजन !
९ ऑगस्ट या दिवशी श्रावणी संस्कार सोहळ्याचे आयोजन !
नूतन लेख
- शरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकली ! – महेश जाधव, भाजप
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा ! – पेठवडगाव पोलीस ठाण्यात निवेदन
- जयंती नाल्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत !
- भोर (पुणे) येथे १०० टक्के मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !
- सांगली येथील पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे उत्साहात विसर्जन !
- कागवाड येथील श्री गणेश मंदिरात ‘श्री गणेश सहस्रनाम अभिषेक’ कार्यक्रम उत्साहात पार पडला