स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

स्वामी विवेकानंद

तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे. ‘या जगात तुम्ही एक परके आहात, एक प्रवासी आहात’, या भावनेने कर्म करा. निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)