आजपासून ‘ब्राह्मणसभा करवीर’च्‍या वतीने कीर्तनमाला !

‘ब्राह्मणसभा करवीर मंगलधाम’च्‍या वतीने काढण्‍यात आलेले प्रसिद्धीपत्रक

कोल्‍हापूर – प्रतिवर्षीप्रमाणे ‘ब्राह्मणसभा करवीर’च्‍या वतीने ५ ऑगस्‍ट ते ४ सप्‍टेंबर या कालावधीत श्रावण मासामध्‍ये ‘ब्राह्मणसभा करवीर मंगलधाम’, मंगळवार पेठ, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर दक्षिणद्वाराजवळ प्रतिदिन सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत कीर्तनमाला आयोजित केली आहे. यात ५ ते १२ ऑगस्‍ट या कालावधीत चिपळूण येथील ह.भ.प. महेशबुवा काणे, १३ ते १९ ऑगस्‍ट या कालावधीत संभाजीनगर येथील ह.भ.प. जागृती जहागीरदार, २१ ते २८ ऑगस्‍ट या कालावधीत मुंबई येथील ह.भ.प. कु. गौरी खांडेकर यांचे, तर २९ ऑगस्‍ट ते ४ सप्‍टेंबर या कालावधीत पुणे येथील ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर यांचे कीर्तन होईल. हिंदु धर्मातील पवित्र श्रावण मासातील कीर्तनमालेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन अध्‍यक्ष श्री. संतोष कोडोलीकर, उपाध्‍यक्ष सौ. वृषाली कुलकर्णी, कार्यवाह श्री. श्रीकांत लिमये आणि श्रावण मास समितीचे प्रमुख श्री. मधुसूदन तथा किरण धर्माधिकारी यांनी केले आहे.