घुसखोरांनी बनावट कागदपत्रांसह पारपत्रही सिद्ध केले !
पुणे – गेल्या काही वर्षांपासून ४ बांगलादेशी हे घुसखोरी करून पिंपरी-चिंचवडसह पुण्यामध्ये रहात होते. त्यांच्याकडे जन्म दाखला, आधारकार्ड आणि पॅन कार्ड अशी बनावट कागदपत्रे मिळाली असून त्यातील २ जणांनी त्या कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढल्याचे पोलीस अन्वेषणामध्ये उघड झाले आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी घुसखोरांना अटक केली आहे.
सागोर बिश्वास, देब्रोतो बिश्वास, जॉनी बिश्वास आणि रोनी सिकंदर अशी त्यांची नावे आहेत. सागोर हा सांगवी पोलीस ठाण्यात ‘व्हेरिफिकेशन’साठी (पडताळणीसाठी) गेला होता. पारपत्र आणि चारित्र्य पडताळणी करणार्या पोलीस कर्मचार्याला संशय आला. दिलेल्या कागदपत्रांनुसार पुढील अन्वेषण केले असता सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याला कह्यात घेऊन चौकशी केली असता पुनावळे आणि पुणे कॅम्प भागातून अजून ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. या ४ जणांनी अवैधरित्या भारतामध्ये घुसखोरी केल्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :
|