अमरावती – गेल्या एक वर्षापासून पाठलाग करून त्रास देणार्या आरोपीने १८ वर्षीय युवतीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यानंतर नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. युवतीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. प्रफुल्ल मुकुंद काळकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. आरोपीने तरुणीला जिवे मारण्याची आणि ॲसिडने आक्रमण करण्याची धमकीही दिली होती.
आरोपी गेल्या वर्षभरापासून युवतीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. या प्रकरणी युवतीच्या पालकांनी आरोपीच्या विरोधात तक्रार केल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली; पण जामीन मिळाल्यानंतर पुन्हा आरोपीने युवतीचा पाठलाग करून तिला त्रास दिला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून युवतीच्या पालकांनी घराजवळील एका महाविद्यालयात तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. युवती मैत्रिणीसमवेत महाविद्यालयात जातांना अचानक मागून आलेल्या आरोपीने तिच्यावर आक्रमण केले. आता तिच्या गळ्याला सहा टाके पडले आहेत.
संपादकीय भूमिकापहिल्याच वेळी आरोपीला कठोर शिक्षा झाली असती, तर ही वेळच आली नसती ! |