|
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या साऊथपोर्ट शहरात २९ जुलैला एका १७ वर्षीय युवकाने चाकूद्वारे आक्रमण केल्याच्या घटनेमध्ये ३ मुलींचा मृत्यू झाला, तर ११ हून अधिक जण घायाळ झाले. हत्या करणारा इस्लामशी संबंधित असल्याचे सांगत ‘इंग्लिश डिफेन्स लीग’ या राष्ट्रवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साऊथपोर्टच्या मशिदीवर आक्रमण केले आहे. या वेळी दगडफेक, तसेच जाळपोळही करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केल्याच्या घटनाही घडल्या. या वेळी आंदोलकांनी ‘आम्हाला आमचा देश परत हवा’ अशा घोषणा दिल्या. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असे त्यांनी म्हटले आहे.
१. मुलींची हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या कह्यात आहे. त्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. ब्रिटीश पोलिसांनी आरोपीच्या आक्रमणाला आतंकवादी घटना मानण्यास आधीच नकार दिला असून आरोपीचा जन्म ब्रिटनमध्ये झाल्याचे म्हटले आहे.
२. २९ जुलैला उन्हाळ्याच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर साऊथपोर्टमध्ये प्रसिद्ध पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांच्या योग आणि नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी आक्रमणकत्याने अनेक मुलींना चाकूने लक्ष्य केले. या आक्रमणात ३ मुलींचा मृत्यू झाला. घायाळ झालेल्या अनेकांची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिकाइंग्लंडसह संपूर्ण युरोपमध्ये लक्षावधी मुसलमान शरणार्थी रहात असून ते तेथील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देत असल्याच्या अनेक घटना गेल्या दशकभरात घडल्या आहेत. त्यामुळेच तेथील जनता मोठ्या प्रमाणात याचा विरोध करू लागली असून राष्ट्रवादाला पाठिंबा मिळत आहे. आता साऊथपोर्टची घटना पाहून अशा प्रकारे मशिदींवर आक्रमण होणे, यात काय आश्चर्य ! |