Pakistan Shia Sunni Dispute : पाकिस्‍तानात शिया आणि सुन्‍नी यांच्‍यातील हिंसाचारात ६ दिवसांत ४९ जण ठार

पाकिस्‍तानमधील हिंसाचार

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – पाकच्‍या खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतामधील कुर्रम जिल्‍ह्यातील बुशेहरा गावात शिया आणि सुन्‍नी या समाजामध्‍ये ३० एकर भूमीच्‍या वादातून झालेल्‍या हिंसाचारात आतापर्यंत ४९ जणांचा मृत्‍यू झाला, तर २०० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. सध्‍या या गावात पोलीस आणि सुरक्षा दल यांचा मोठा ताफा तैनात करण्‍यात आला आहे. कुर्रमचे उपायुक्‍त जावेदुल्ला मेशुद यांनी सांगितले की, हा संघर्ष ६ दिवसांपासून चालू आहे.

गेल्‍या वर्षी दोन्‍ही बाजूंमधील भांडण थांबल्‍यानंतर त्‍यांच्‍यात सामंजस्‍य करार झाला होता. ही भूमी कुणाची आहे ?, हे सरकार ठरवेल, असे ठरले. दोन्‍ही पक्षांना भूमी विवाद सोडवणार्‍या भूमी आयोगाच्‍या नियमांचे पालन करावे लागेल. यानंतर आयोगाने निर्णय देत ही भूमी शिया समुदायाला दिली. त्‍याच्‍या वर्षभरानंतर आता पुन्‍हा वाद चालू झाला.

संपादकीय भूमिका

मुसलमान ज्‍या देशात अल्‍पसंख्‍य असतात, तेथे ते अन्‍य धर्मियांना लक्ष्य करतात आणि जेथे ते बहुसंख्‍य असतात तेथे ते आपापसांत हिंसाचार करतात ! हिंसाचार करणे हीच त्‍यांची वृत्ती आहे, असे कुणी म्‍हटल्‍यास चुकीचे ठरू नये !