स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म, इतिहास आणि परंपरा या राष्ट्रीय अहंमन्यतेच्या अन् अनुकरणाच्या प्रभावानेच राष्ट्र मोठे होऊ शकते !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, हिंदु-मुसलमान ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार, अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवणे अन् स्वाभिमानी सत्तेने देशावर राज्य केल्यास काय झाले असते ?, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्वाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न, विश्वातील राष्ट्रांमधील समस्या’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक २६)
प्रकरण ४
७. हिंदु राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव न वाढल्याचे कारण
गेल्या ६० वर्षांत हिंदु राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव वाढली नाही, याचे कारण ती वाढवावी, अशी इच्छाशक्तीच या देशाच्या राजसत्तेत नव्हती. तिचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन ज्या प्रमाणात घडेल, त्याच प्रमाणात हे राष्ट्र बलशाली अन् स्वत्व परिपूर्ण होईल. आमची भाषा सर्वश्रेष्ठ, आमची संस्कृती सर्वश्रेष्ठ, आमचा धर्म, इतिहास आणि परंपरा सर्वश्रेष्ठ या राष्ट्रीय अहंमन्यतेच्या अन् अनुकरणाच्या प्रभावानेच राष्ट्र मोठे होऊ शकते, हे जपान, जर्मनी, इस्रायल, इंग्लंड या देशांनी दाखवून दिले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
८. राष्ट्राभिमानी विरांचे स्मरण करणे आवश्यक !
हे सर्व लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, राणा प्रताप त्याचप्रमाणे आधुनिक क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, भगतसिंह, उधमसिंह, सुभाषचंद्र बोस अशा दैदीप्यमान राष्ट्राभिमानी विरांचे स्मरण या ठिकाणी अनाठायी ठरणार नाही.
प्रकरण ५१.
|
‘भारतीय समाजात स्त्रीला दुय्यम स्थान आहे. ‘चूल आणि मूल’ एवढेच तिचे जीवितकार्य ! घराबाहेर तिला स्थान नाही आणि घरांतही ती केवळ दासीच आहे’, अशा प्रकारचा प्रचार काही हिंदुद्वेष्टे स्त्रीभक्त करत असतात. त्यासाठी मनुस्मृतीतील ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।’ (मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३), म्हणजे ‘स्त्री सुरक्षित नाही, अशी स्थिती कधी असू नये’, हा श्लोक आठवतो.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक घटकाचा विचार करतांना ईश्वराने त्या घटकाची निर्मिती कशासाठी आणि कशा स्वरूपात केली आहे, याचा विचार प्रथम केला जातो. त्याप्रमाणे त्या घटकाचे कार्य ठरते, हे अगदी तर्कशुद्ध.
२. विधात्याने निर्माण केलेली स्त्रीच्या शरिराची रचना !
स्त्री आणि पुरुष यांचा देह, बुद्धी अन् मन यांचा विचार करता लक्षात येते की, हे दोन्ही घटक या तिन्ही दृष्टींनी अगदी भिन्न आहेत. त्यांत श्रेष्ठ-कनिष्ठता नसून भिन्नता आहे. स्त्रीच्या शरिराच्या रचनेत नाजूकता, कोमलता, यौवनात येणारी आकर्षकता, पुष्ट स्तन, नितंब यांचे डौलदार आकार, मधुर आवाज यांची योजना करतांनाच तिला विधात्याने पुरुषांचे मन लुब्ध करणारी बनवली आहे. त्याचप्रमाणे गर्भधारणा आणि मातेच्या उदरात नवमास संवर्धन ही गर्भासाठी केलेली व्यवस्था अन् त्याचसमवेत प्रसूती यातना, पुढे अपत्य संगोपनासाठी स्तनपानाची योजना विधात्याने तिच्याच शरिरात निर्माण केली आहे.
३. स्त्री – बालिका, गृहिणी आणि माता !
आपल्या जीवनाच्या साथीदारावर अतोनात प्रेम, अपत्याविषयी वात्सल्य, आपले घर आणि घरातील विविध वस्तूंविषयी ममत्व हे स्त्रीच्या मनाचे विशेष आहेत. त्या अर्थाने ती गृहिणीच आहे. बालपणी आई-वडिलांवर अतोनात प्रेम करणारी बालिका, यौवनात आपल्या पतीच्या प्रेमात आई-वडिलांनाही विसरते आणि अपत्यप्राप्तीनंतर तिचे सारे जीवन सर्वस्व मातृत्वभावनेने बहरून जाते.
४. स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष !
बौद्धिकदृष्ट्या विचार केल्यास स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष असते, हे सहज दिसेल. नोकरी करणार्या स्त्रियांत बहुसंख्य स्त्रिया अधिक कर्तव्यपरायण आढळतात. त्यांचे अक्षर चांगले असते. स्मरणशक्ती तीव्र असते. कुणाशी कसे वागावे, याचे तारतम्यही तिला उत्तम असते. कामातील नियमितपणाही लक्षणीय असतो. या ईश्वरदत्त पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीने तिची जडणघडण केलेली आहे. उपरोक्त गुणांचे काही प्रमाणात दोषांतही रूपांतर होऊ शकते. तिची नाजूकता, कोमलता हीच तिची दुर्बलता ठरू शकते. तिच्या सुदृढ आणि डौलदार, तसेच आकर्षक शरिरामुळेच ती पुरुषाच्या मनाला वेड लावू शकते. तिचा मधुर आवाज ‘तिच्याशी बोलत रहावेसे वाटावे’, अशी इच्छा पुरुषांच्या मनात उत्पन्न करतो. तिचे अपत्यप्रेम हेच वार्धक्यातील तिच्या अपेक्षाभंगाचे कारण ठरू शकते. तिचे पतीवरील अनन्यसाधारण प्रेम हेच वैधव्याचा प्रसंग आला, तर स्वतःचे सर्वस्वच गेल्याप्रमाणे तिच्यात विकलता आणते. तिचे मातृत्व हेच तिला घरात बांधून ठेवणारे असते. – भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/819415.html