कल्याण येथे रायता नदीच्या पुरात काही जण वाहून गेले रायते पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद

कल्याण –  रायता नदीच्या पुरात वाहून चाललेल्या इब्राहिम शेख या इसमाला एका झाडाचा आधार मिळाला. तो झाडावर चढून बसला. झाडावर अडकलेला पाहून गावकर्‍यांनी दोरीच्या आधारे त्याचा जीव वाचवला आहे. प्रवाहाच्या विरोधात तो पोहत राहिला. रायते गावकर्‍यांनी बचाव पथकाला पाचारण करून त्याला वाचवले.

बारवी धरणाच्या मागच्या पाण्यामध्ये टाकीची वाडी येथून काही जण वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, तसेच अग्नीशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी शोधकार्य चालू केले होते.

२५ जुलै या दिवशी उल्हास नदीची १८.८० मीटर इतकी सर्वोच्च पातळी वाढली होती. २६ जुलै या दिवशी पातळी घटल्याने बदलापूर शहरावरचे पूर संकट टळले आहे.

रायते पूल बंद

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर रायते येथील पुलावर पाणी साचल्याने २५ जुलै या दिवशी वाहतूक ठप्प होती. या पुलावर खड्डे पडले असून डांबर वाहून गेले आहे. कठडे तुटल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता.