१. इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ची अंतिम पडताळणी करतांना चुकलेल्या शब्दांकडे गुरुकृपेने आपोआप लक्ष जाणे आणि ते शब्द सुधारता येणे : ‘मला इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ची अंतिम पडताळणी करावी लागते. तेव्हा मला वेळेअभावी सर्वच मजकूर पडताळणे शक्य नसते. मी केवळ पडताळणी सूचीप्रमाणे पडताळतो. माझ्याकडून अन्य मजकूर पूर्ण पहाणे होत नसले, तरी काही शब्दांकडे माझे आपोआप लक्ष जाते आणि ‘तिथे चूक झाली आहे’, असे माझ्या लक्षात येते. मी तिथे सुधारणा करतो. ‘हे सर्व केवळ गुरुकृपेमुळेच शक्य होते’, हे माझ्या लक्षात येते.
२. एका सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वरील अनुभूती सांगतांना मला ‘एक कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली’, असे मला वाटले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना एवढे शारीरिक त्रास असूनही त्यांनी मला भेटीची एक संधी दिली. ‘त्यांना साधकांविषयी किती प्रीती आहे !’, हे मला जाणवले’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म
डॉ. आठवले यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी, (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |