५२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. हंसिनी चैतन्य आचार्य (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. हंसिनी आचार्य ही या पिढीतील एक आहे !

आषाढ शुक्ल चतुर्दशी (२०.७.२०२४) या दिवशी कुमटा (जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटक) येथील कु. हंसिनी चैतन्य आचार्य हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आईसौ. शिल्पा चैतन्य आचार्य यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. हंसिनी आचार्य हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. हंसिनी आचार्य

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

अ. ‘मी गरोदर असतांना सतत कुलदेवाचा नामजप करत असे. मी नामजप करत असतांना पोटातील गर्भ हालचाल करून प्रतिसाद देत असे.

२. जन्मानंतर

सौ. शिल्पा चैतन्य आचार्य

२ अ. जन्म ते ५ वर्षे

अ. मी बसून नामजप करत असतांना हंसिनी बालपणापासून माझ्याजवळ बसत असे. ती शांत बसून तिला सांगितलेला नामजप करत असे.

आ. मी तिला सत्संगाला किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांना घेऊन जात असे. तेथे ती दंगा न करता पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शांत रहात असे.

२ आ. वय ५ ते १२ वर्षे

२ आ १. प्रेमभाव

अ. आमच्या घरी साधक आल्यावर हंसिनी त्यांचे प्रेमाने स्वागत करते आणि ती त्यांच्याशी आदराने बोलते.

२ आ २. समंजस

अ. हंसिनी कधीही हट्ट करत नाही. तिला जेवणा-खाण्याच्या बाबतीत कसलीही आवड-नावड नाही.

२ आ ३. सेवेची आवड

अ. ती माझ्या समवेत संस्थेच्या सर्व कार्यक्रमांना येत असे. ती मला सेवेत साहाय्य करत असे.

आ. एकदा आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होते. तेव्हा हंसिनीने साधकांकडून सेवा मागून घेतली आणि ती मनापासून केली.

२ आ ४. गुरुंप्रती भाव

अ. ‘गुरुदेवच सर्व करतात’, अशी तिची श्रद्धा आहे.

आ. तिला ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रथमच दर्शन झाले. तेव्हा तिची भावजागृती झाली आणि तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले. तिला गुरुदेवांना पाहून आनंद होत होता.’

– सौ. शिल्पा चैतन्य आचार्य (कु. हंसिनीची आई), कुमटा, जिल्हा उत्तर कन्नड

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक