NASA Cancels Moon Rover Mission : ‘नासा’ने चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम केली रहित !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की, ती पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम रहित करत आहे. खर्चात वाढ आणि प्रक्षेपणाला होणारा विलंब यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  रोव्हरचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणे, हा होता.