Financial Assistance To Muslimwadi : मुसलमानवाडी (कोल्‍हापूर) येथील ५६ कुटुंबियांना तातडीने आर्थिक साहाय्‍य !

मुसलमानवाडी येथील लोकांना आर्थिक साहाय्‍य देतांना जिल्‍हाधिकारी  अमोल येडगे (डावीकडे)

कोल्‍हापूर – १४ जुलैला विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरणी हिंदूंचा उद्रेक झाला होता. या उद्रेकात मुसलमानवाडी येथील ग्रामस्‍थांच्‍या घरांची हानी झाली होती. यात प्रापंचिक साहित्‍याची नासधूस करण्‍यात आली होती. मुसलमानवाडी येथील ५६ कुटुंबियांना शासनाच्‍या वतीने तातडीने साहाय्‍य म्‍हणून प्रापंचिक साहित्‍यासाठी २५ सहस्र रुपये आणि घर दुरुस्‍तीसाठी ४१ घरांना प्रत्‍येकी २५ सहस्र रुपये धनादेशाद्वारे देण्‍यात आले.

मुसलमानवाडीतील इतर सर्व हानीविषयी पंचनामे करून विस्‍तृत अहवाल बनवण्‍यात आला आहे. हा अहवाल सरकारला जिल्‍हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे.

संपादकीय भूमिका

दंगलग्रस्‍त हिंदूंना कधी एवढ्या तातडीने साहाय्‍य मिळाल्‍याचे ऐकिवात आहे का ? महाराष्‍ट्रातील आतापर्यंत झालेल्‍या दंगलींमध्‍ये हिंदूंच्‍या घरांची राखरांगोळी झाली, हिंदूंचे संसार उद़्‍ध्‍वस्‍त झाले, हिंदूंच्‍या आई-बहिणींची अब्रू लुटण्‍यात आली. त्‍यांना सरकारने कधी साहाय्‍य केले आहे का ?