कोल्हापूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर ते प्रतिपंढरपूर असलेल्या नंदवाळ या मार्गावर वारकर्यांची दिंडी पार पडली. खंडोबा मंदिर रस्त्यावर उभे रिंगण पार पडले. या दिंडीत राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून साकारलेला वैशिष्ट्यपूर्ण रथ सहभागी झाला होता. या प्रसंगी ह.भ.प. आनंदराव लाडमहाराज, डॉ. एम्.पी. पाटील, श्री. राजेंद्र मकोटे यांसह श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळाचे वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.