नवी मुंबई – येथील तळोजा भागामध्ये एके ठिकाणी वासरू पकडून ठेवले होते. गोरक्षक आणि ४-५ पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दार उघडण्यास सांगितल्यावर १० ते १५ धर्मांध त्यांच्यावर धाऊन आले. पोलिसांच्या समक्ष त्यांनी गोरक्षकाला मारले. त्या वेळी पोलिसांनी धर्मांधांवर कुठलीही कारवाई केली नाही; उलट अनेक धर्मांध एकत्र आले आणि त्यांनी त्या भागातून गोरक्षक आणि पोलीस यांना पिटाळून लावले. या सर्व घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. गोरक्षक कैलास रेपाळे, विशाल बिंद, प्रतिक ननावरे, तेजस पाटील यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले. या प्रकरणी ७ धर्मांधांवर तुळजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोहरमच्या निमित्ताने काही धर्मांध त्यांच्या घरी गोमातेची हत्या करून गोमांस विक्री करणार आहेत, अशी गोरक्षकांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गोरक्षकांनी तळोजा पोलिसांसह येथे धाड टाकली होती. येथे काही गोवंशियांना चारा आणि पाणी न ठेवता बांधून ठेवण्यात आल्याचे आढळले, तसेच काही जण गोवंशाचे मांसही विकत होते.
संपादकीय भूमिका
|