नवी देहली – काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतीय गायक दिलजीत दोसांझ यांची टोरंटो शहरात भेट घेतली होती. येथील रॉजर्स सेंटरमध्ये होणार्या त्यांच्या कार्यक्रमाची सर्व तिकिटे विकली गेल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले होते. त्या वेळी ट्रूडो यांनी त्यांचा उल्लेख ‘पंजाबी गायक’ असा केला होता. त्यावर भाजपने टीका केली आहे.
‘We would like to tell them that Diljit, whose programs in Canada’s auditoriums are getting jam-packed like never before, hails from India and not from Punjab’. – Manjinder Singh Sirsa (@mssirsa) leader BJP criticizes Canadian PM Justin Trudeau, for referring Diljit Dosanjh as a… pic.twitter.com/QuqvDoWNJK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2024
भाजपचे प्रवक्ते मनजिंदर सिंह सिरसा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ट्रूडो यांनी पंजाबी गायकाच्या स्तुतीसाठी निवडक शब्द वापरले आहेत. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, दिलजीत हा पंजाबचा नसून भारताचा आहे, जो कॅनडाच्या सभागृहांमधील सर्व कार्यक्रम ‘हाऊसफुल’ करून इतिहास रचत आहे.
संपादकीय भूमिकाजस्ट्रिन ट्रूडो शीख आणि खलिस्तानी यांच्या मतांसाठी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच यावरून लक्षात येते ! |